प्रस्तावना
राज्यातील नाथपंथीय समाजाची सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी नाथपंथी समाजाच्या लोकांचा विकास करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय क्रमांकः महाम-२०२४/प्र.क्र.८०/महामंडळे, दिनांक ०४ मार्च, २०२५ अन्वये वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ या उपकंपनीची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
नाथपंथीय (नाथपंथी डवरी गोसावी, नाथजोगी, भराडी जोगी, किंगरीवाल, मरीआईवाले, बहुरूपी, गोसावी, स्मशान जोगी, बाळसंतोषी किंगरीवाले, गोंधळी, डोंबारी, चित्रकथी) या समाजातील लोकांना वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा (25%बीज भांडवल कर्ज योजना, रु.१.०० लाख थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु.१०.०० लक्षपर्यंत (बॅंकामार्फत), गट कर्ज व्याज परतावा योजना(रु.१०.०० लक्ष ते रु.५०.०० लक्ष (बॅंकामार्फत)) लाभ मिळून त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी व आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्याकरिता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. अंतर्गत, उपकंपनी म्हणून “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळाची” स्थापना करण्यात आली आहे.
परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळास (उपकंपनी) अधिकृत भागभांडवल रु.५०.०० कोटी ( अक्षरी पन्नास कोटी फक्त ) मंजूर करण्यात आले आहे. दरवर्षी या उपकंपनीस विविध योजना राबविण्यसाठी रु. ५.०० कोटी इतके भागभांडवल मंजूर करण्यात येईल.