बंद

    वैयक्तिक कर्ज व्‍याज परतावा योजना

    • तारीख : 04/03/2025 -
    1. शासनाकडून प्राप्त सहायक अनुदान रकमेतून महामंडळाकडून ही योजना राबविली जाईल
    2. बँकेकडून कर्जमर्यादा रु. 10.00 लक्षपर्यंत असेल .
    3. कुटूंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
    4. बँकेने रू. 10.00 लाखापर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या उमेदवाराने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास, हफ्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (12 % च्या मर्यादेत) त्यांच्या आधार लिंक, बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. सदर योजना संपूर्णपणे संगणकीकृत असून सदर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येईल. व्यवसायाच्या स्वरूपानुसार कर्ज रक्कम मंजूर करण्यात येईल.

    5. वेबपोर्टल / महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य असेल.
    6. कर्ज परतफेडीचा कालावधी बँक निकषांनुसार असेल.

    वसंतराव नाईक विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळाची संकेतस्थळाची लिंक

    लाभार्थी:

    लाभार्थी हा महाराष्‍ट्र राज्‍यातील नाथपंथीय (नाथपंथी डवरी गोसावी, नाथजोगी, भराडी जोगी, किंगरीवाल, मरीआईवाले, बहुरूपी, गोसावी, स्मशान जोगी, बाळसंतोषी किंगरीवाले, गोंधळी, डोंबारी, चित्रकथी) या समाजीतील असावा

    फायदे:

    बॅंकेने मंजूर केलेल्‍या कर्ज रक्‍कमेचे नियमित हप्‍ते भरल्‍यास व्‍याजाची रक्‍कम (१२% च्‍या मर्यादेत) व्‍याज परतावा रक्‍कम अनुदान स्‍वरुपात बॅंक प्रमाणिकरणानुसार लाभार्थींच्‍या आधार लिंक बॅंक खात्‍यात दरमहा महामंडळामार्फंत जमा करण्‍यात येईल

    अर्ज कसा करावा

    अर्जदाराने वर दिलेल्या वसंतराव नाईक विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळाच्या संकेतस्थळावरील लिंक वर क्लिक करावे.